अंधारछाया - 7

  • 6.1k
  • 2.6k

अंधार छाया सात शशी आज शुक्रवार म्हणजे एच व्ही सर दाढी करून येणार आणि चिडणार! मग स्पेलिंग चुकलं की बसणार पट्ट्या हातावर! विचार करत मी एकनॉलेजमेंट म्हणजे पोच असे पाठ करत होतो. मनात येई दाढी करणं आणि रागावणं याचा काही संबंध असेल तर मी दाढी करणार नाही मोठेपणी! आत आई बेबी बोलत होत्या. लती काहीतरी दौत पेनाशी चाळे करत होती. आजी दुर्वा तोडायला फिरत होत्या बाहेर फुलझाडांपाशी. दादा सायकलवरून गेलेले पाहिले ऑफिसला, मग मी सकाळ घेतला हातात. ‘क्रीडा विषयक बातम्या हे पुढच्या पानावर का देत नाहीत? आहाला काय करायचय ते मंत्री काय म्हणताय ते वाचून.’ जरा सिनेमाच्या जाहिराती वाचेपर्यंत आईची