तृष्णा अजूनही अतृप्त - भाग २१

(25)
  • 13.1k
  • 2
  • 6k

पहाटेचे साधारण तीन वाजले असावे. हॉस्पिटलच्या आत बाहेर एकदम शांतता पसरली होती. रुग्णांच्या नातेवाइकांना रात्री आत प्रवेश नसल्याने सगळ्याच वॉर्डचा मुख्य दरवाजा बंद होता. दिवसभर माणसांनी गजबजून गेलेले वॉर्डस चिडीचूप पडले होते. वॉर्डबॉईजही सगळ टेंशन झटकून कधीचेचं झोपी गेले होते. पॅसेजमध्ये अगदी नावाला मंद दिवे जळत होते. अंधुकश्या प्रकाशापेक्षा काळोखच जास्त भरून राहिलेला. त्या काळोखात एक सावली हळूच भिंतीच्या आधाराने खुरडत सरकत होती. पावलांचा आवाजही न करता ती सावली तिच्या रुमच्या दिशेने वळली. रात्रीच्या अंधारात दरवाजा जरा कुरकुरलाच. त्या आकृतीने वळून इथला तिथला कानोसा घेतला. दरवाज्याच्या आवाजाने कोणाचीच झोप तुटली नव्हती. त्या आकृतीने हलकेच सुटकेचा निःश्वास सोडला. उघड्या दारातून ती