शोध चंद्रशेखरचा! ४---- इन्स्पे.इरावती तिच्या पोलीस स्टेशनला पोहंचली, तेव्हा दुपार टाळून गेली होती. येतायेत तिने सोबत आणलेली ऑइल असलेली माती आणि तो रक्ताळलेले कपड्याचा तुकडा परीक्षणासाठी, फॉरेन्सिस लॅब मध्ये दिला होता. फिंगर प्रिंट आणि ब्लडचा रिपोर्ट सकाळपर्यंत येणार होता. शिंदेकाकाच्या तपासाची माहिती पण, रात्री जेव्हा ते येतील, तेव्हा कळणार होती. आता फक्त त्या अपघातग्रस्त गाडीच्या रजिस्ट्रेशनची माहित मिळू शकणार होती. तिने राकेशला फोन करून लक्षात ठेवलेला गाडी नंबर सांगितला. आणि माहिती काढण्यास सांगितले. तो RTOच्या ऑफिसिअल साईट वरून माहिती काढू शकणार होता. राकेश डिपार्टमेंटचा सायबर जीन होता. पद नसले तरी, तो हौसेने हे काम करायचा. त्याला या कामात गती होती.