दुपारची उन्ह करकर तापली होती. रेल्वे स्टेशनच्या दादऱ्याखाली, ते दोन मळक्या, फाटक्या कपड्यातले भिकारी सावली धरून बसले होते. नुकतीच बाराची प्यासिंजर निघून गेली होती. 'धंद्याच्या' दृष्टीने त्यांचा हा 'भाकड' पिरेड होता. त्या मुळे ते दोघे 'सुख -दुःखाच्या' गप्पा मारत असावेत असे, पहाणाऱ्यांना वाटत होते. आणि ते खरे हि होते. ज्यास्त कमाई(विना सायास ) म्हणजे ज्यास्त सुख हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते! हाच त्यांच्या गप्पांचा विषय पण होता. रघ्या दोन दिवसान पासून पप्याचा मागे लागला होता. "पप्या, यार, तेव्हड ते, 'मामा'शी सेटिंग करून दे ना!" आज चौथ्यांदा रघ्याने विनंती केली. "रघ्या, साल्या, तुला माझ्या 'इलाख्यात', माझा फंडा नाय चालवता येणार!""कबूल!,