उद्या महिन्याचा दुसरा शनिवार, परवा रविवार सरकारी सुट्टी आणि सोमवार, मंगळवार पर्सनल सुट्टी. असा चार दिवसाच्या सुट्टीत, सहपरिवार कोकणचा भाग फिरायचा प्लॅन रवीचा होता. पुढील कामाचा ताण कमी करण्यासाठी त्याला आज जरा जास्त उशीर झाला. रोजची रेल्वे निघून गेली, रवीला ऑफिसमध्येच 8 वाजले. सर्व काम आटोपून तो प्युन च्या गाडीवरून रेल्वे स्टेशनकडे निघाला, बोलता बोलता स्टेशन आले. तेवढ्यात गाडी सुटण्याचा भोंगा वाजला.रवी गाडी वरून गडबडीत उतरत प्युन ला धन्यवाद देत स्टेशन च्या दिशेने पळत सुटला, " साहेब दम्मानी जा,आज अमवस्या आहे" असा ओरडत निरोप प्युन ने दिला.रवी " हो हो" म्हणत पळत निघाला.रवी स्टेशनवर येऊन धडकला पण बॅड लक् रेल्वेने