कादंबरी - जिवलगा .. भाग- २१

(23)
  • 17.3k
  • 2
  • 11k

कादंबरी – जिवलगा .. भाग – २१ –वा ---------------------------------------------------------------------- नेहाने मग सोनियाला विचारले – ठीक आहे , आज कधी येणार आहेत हे श्रीमान –जगदीशसेठ ? सोनिया म्हणाली – त्याची येण्याची वेळ पक्की आणि ठरलेली असते ..आपला लंच –टाईम दुपारी दीड वाजता असतो , हा बरोबर १२.३० वाजता येईल , ओफिशियाल व्हिजीट म्हणून सांगेन सगळ्यांना ,, मग काय . सगळा स्टाफ हात जोडून पुढे उभा राहणार . एकेकाला केबिन मध्ये बोलावून घेणार .. त्याच्या मर्जीतल्या स्टाफशी छान बोलणार , आणि ज्यांच्या बरोबर त्याचे कधी तरी वाजलेले आहे, अशांना ..विनाकारण काहीही सुनावणार , दुसर्या किरकोळ सेक्शनला पाठवतो ..बघाच तुम्ही “, अश्या धमक्या