लग्नाआधीची गोष्ट - (भाग 2)

(16)
  • 13.2k
  • 8.8k

तीन वर्षापुर्वी तीन वर्षापुर्वी....ट्रेन नगरच्या दिशेने धावत असते.. मुलांचा ग्रुप टवाळक्या करत बसलेला असतो. प्रशांत, सागर, वैभव , अक्षय, गणेश आणि सूरज. तेवढ्यात एका स्टेशनवर तीन मुली येऊन पुढच्या बाकावर बसतात . नेहमीप्रमाणे सूरज खिडकीजवळ बसलेला असतो . त्याच्या समोर एक सलवार घातलेली सुंदर मुलगी बसते .. तिचे ते काळेभोर डोळे व हवेत उडणारे केस यामुळे तिचे सौंदर्य अजूनच खुलून दिसते .सूरज च्या मनात एका कवि ने म्हटलेले काही शब्द घुमू लागले, "समोर एखादी सुंदर स्त्री असेल तर तिच्याकडे न बघणे हा तिच्या सौंदर्याचा केलेला अपमान असतो " त्याच्या तिच्याकडे बघण्यात कोणतीही वासना नव्हती. ती एवढी सुंदर होती की इंद्र लोकमधल्या अप्सरा