२८ फेब्रुवारीआजचा शेवटचा दिवस. आम्ही एकत्र असलो तरी शक्यतो एक-मेकांपासुन दुर रहाण्याचाच प्रयत्न करत होतो. का? कश्यासाठी? आज त्याचा आणि माझा एकमेकांना फारसा असा स्पर्श झालाच नाही, मला अगदी हवा-हवासावाटत होता आणि त्याच्या डोळ्यात बघुन मी खात्रीने सांगु शकते की त्यालाही.. पण तोस्वतःला प्रयत्नपुर्वक माझ्यापासुन लांब ठेवु पहात होता. असो, आम्ही गप्पा मात्र खुप मारल्या. राज सतत काही तरी माझ्या डोळ्यात शोधण्याचा प्रयत्न करत होता.. आणि कदाचीत नकळत मी सुध्दा. दुपारचं जेवण आम्ही एकत्रच घेतलं, म्हणजे तसं एकत्रच जेवतो, पण सर्व जण इतके राजच्या आजु-बाजुला असतात की तो माझ्या समोर असुनही माझा नसतो. आज मात्र आम्ही जरा वेगळे होऊनच जेवलो.