शोध चंद्रशेखरचा! - 2

(12)
  • 10.2k
  • 1
  • 5.4k

शोध चंद्रशेखरचा! २.---- सकाळी साडेपाच वाजता तिचा मोबाईल वाजला. कंट्रोल रूमचा नंबर होता. " इन्स्पे.इरावती! बोला, इतक्या सकाळी काय काम निघालं?" "गुड मॉर्निंग, मॅडम. मी राकेश बोलतोय. सॉरी टू डिस्टर्ब् यु. घाटात एक अपघात झालाय." राकेश इराच्याच बॅचचा. आणि छान मित्र पण होता. त्याला प्रमोशन नव्हते मिळाले म्हणून, तो अजून तिला जूनियरच राहिला होता इतकेच. तरी तो टँलेन्टेड होता. "अरे, यार, घाटात अपघात होतातच. मला का सकाळी, सकाळी त्रास देतोयस?" " इरा, जरा जागी हो. खरे तर रात्रीच तुला फोन करणार होतो. पण तुझ्या नाईट ड्युटीवाल्या शिंदेकाकाला तिकडे पाठवलाय. तू त्याला फोन कर. तो सगळं सांगेल. सुपरिंटेंडन्ट जोग मला बोलावतोय,