ती एक शापिता! - 16

  • 8.5k
  • 1
  • 3.6k

ती एक शापिता! (१६) सायंकाळची वेळ होती. अशोक नुकताच बँकेतून आला होता. नेहमीप्रमाणे तो हातपाय धुवून तयार होत असताना बाहेरून पीयूषचा आवाज आला, "अशोक... अशोक.." "काय रे? आलो. आलो. अग, मी बाहेर जाऊन येतो..." माधवीला सांगून तिच्या उत्तराची प्रतिक्षा न करता आणि तिच्याकडे न बघता अशोक बाहेर पडला. त्याला पाहताच पीयूष ओरडला, "आशक्या, अबे, लक लागलं. नशीब फळफळलं रे." "अरे, पण झाले काय?" "काकदृष्टी हे आपले वर्तमानपत्र पंधरा दिवसात बाहेर पडणार." "पंधरा दिवसात? काय लॉटरी लागली की काय रे?" "होय. तसेच समज. आपले पालकमंत्री आहेत ना, ते वर्तमानपत्र काढत आहेत. मी सुचवलेले काकदृष्टी हेच नाव त्यांना आवडले आणि त्यांनी निवडले.