ब्रेकअपनंतर - १

(14)
  • 6.9k
  • 2
  • 3.5k

प्रेम.... जेव्हा प्रेम होतं ना तेव्हा आयुष्य किती सुंदर वाटत नाही...!जगातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम. प्रेमासारखी दुसरी गोष्ट या जगात नाही. प्रेमातून नात फुलत जात आणि पुढे जाऊन दोन वेक्ती एकरूप होऊन जातात. एवढी ताकत त्या प्रेमाच्या जादूत आहे. प्रेमात सर्वकाही सुंदर दिसत. नेहमी कंटाळा देणारा पाऊस प्रेमात असताना मात्र रोमँटिक वाटू लागतो. कधी स्वतःसाठी जगणारी वेक्ती दुसऱ्याचा विचार करू लागते. दुसऱ्यासाठी जगु लागते. तसच काही माझंही. तो माझ्या बाजूच्या ऑफिसमध्ये काम करायचा. आमची पार्किंगमध्ये ओळख झाली. मग काय रोजच भेटन व्हायच. तो आला आणि सगळं काही बदललं. नव्याने सुरुवात झाली प्रेमाची. तसा मला पाऊस नेहमीच आवडायचा पण त्याला जरा जास्तच.