तृष्णा अजूनही अतृप्त - भाग २०

(32)
  • 12.7k
  • 3
  • 5.7k

ती पूर्णपणे त्या शक्तीच्या कह्यात होती. ओमच्या सुचनेप्रमाणे अनय भराभर राखेने रिंगण रेखाटत खिडकीजवळ पोचला होता. आत काय चाललंय ते डोकावून पाहण्यासाठी त्याने सहजच खिडकीची काच ढकलली. आत कसल्याशा हवनाची तयारी मांडलेली होती. एक भलामोठा यज्ञ ढणढणत जळत होता. बाजूलाच एका शैयेवर ती नखशिखांत सजून त्याच्या प्रतीक्षेत उभी होती. त्याच्या प्रेमात चिरविहिरणी होऊन त्याच्या प्रणयात न्हाऊन जाण्यासाठी ती उतावीळ होती. तिचे हे भाव तिच्या नटलेल्या सलज्ज चेहऱ्यावर अनयपासून लपून नाही राहू शकले. एक पती म्हणून त्याच्या आत द्वेषाची आग उफाळून आली मात्र त्याच सोबत मनात तिची काळजीही होती. कदाचित जर त्यांचा प्रणय ही शेवटची पायरी असेल तर तिचा वापर झाल्यावर