आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (11) त्यांनी सिद्ध करून मगच सुमैयाशी न बोलण्याचा आणि दूर राहण्याचा सल्ला दिला होता. पण मी इतका बेभान का झालो होतो? आता हा भयानक एकांत मला सतावत होता. त्या तिघांनाही मी खूप दुखविलं होतं. नको नको तेबोललो होतो. माझं चुकलं तिथं त्यांनी समजावलं होतं. पण एका क्षणाला मीकसा काय बदललो. एकमेकांच्या विचाराने आणि सल्ल्याने या गोष्टीवर पडदा पाडता आला असता. या आणि अशा अनेक विचारांनी माझं मन मला खात होतं. अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. सतत बैचेन आणि उदास होतो. एक दिवस खूप आजारी पडलो. दोन दिवस कॉलेजला गेलो नाही. सुरेश, संदिप, अनिलच्या ही गोष्ट