वृद्धाश्रम नसे योग्य मार्ग...

  • 4.1k
  • 1.5k

आज वृद्धाश्रमाच्या वाटेने मनोहर बरोबर जात असताना कृष्णादास यांचे डोळे भरून आले होते. आपल्यावर कधी हा वेळप्रसंग ओढवेल असे स्वप्नातही त्यांना वाटले नव्हते. आज मनोहरची आई असती तर कदाचित मला हे दिवस बघावे लागले नसते असे विचार वारंवार कृष्णादास यांच्या मनात येत होते की सरोजिनी ही जिवंत असती तर तिलाही माझ्याबरोबर मनोहरने वृद्धाश्रमात धाडले असते का? कृष्णादास यांचे मन आतल्या आत रडत होते.. लाडाने कृष्णादास मनोहरला मनू म्हणायचे... आज ज्या हातांनी मनूला लहानाचे मोठे केले, वाढवले, शिकवले ते हा दिवस पाहण्यासाठी का? मनूला खेळण्यासाठी बागेत घेऊन जायचो, मनू खेळताना पडू नये म्हणून डोळ्यात