व्हॉटस्अपचा फॉरवर्ड गिअर

  • 3.7k
  • 1.4k

काही काळापूर्वी लिखाण सार्वत्रिक करण्यासाठी मुद्रित माध्यमांशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. आणि या माध्यमातून लिखाण प्रसिध्द होणे ही काही सोपी प्रक्रिया नव्हती. प्रसिध्दीसाठी आलेले लिखाण प्रसिध्दीयोग्य आहे की नाही, समाजजीवनावर त्याचे काय परिणाम होतील याची खात्री करुन, त्यातील मजकूराची सत्यता पडताळून मग त्यावर संपादकीय संस्कार, मुद्रितशोधन संस्कार असे सोपस्कार पार पडल्यानंतरच ते लिखाण प्रसिध्द होत असे. आणि आजही मुद्रित माध्यमे ही किचकट परंतु आवश्यक अशी जबाबदारी काटेकोरपणे पार पाडत आहेत. काळानुसार सगळ्याच क्षेत्रात बदल होत चालले, त्यामुळे प्रकाशन क्षेत्र तरी त्याला अपवाद कसे असणार. याही क्षेत्रात पुढे ब्लॉगींग सारखी माध्यमे उदयास आली. ब्लॉगींगच्या माध्यमातून लेखन स्वतःच प्रसिध्द करायचे असल्यामुळे, कोणत्याही