माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 11

  • 6.4k
  • 1
  • 2.2k

११ वै चे गुडनाइट! मी घरात परत आलो.. संध्याकाळ सगळी बागेत फुलांमध्ये गेलेली. शेवटी सगळे विचार संपवून नि ती कविता करून घरात शिरलो तर रात्र झालेली. घर भरलेले. सारी जेवायला बसली मंडळी. उद्याचा एक दिवस. मग हळदीचा समारंभ.. मग लग्न सोहळा.. हे अमेरिकन टूरिस्ट कधी जाणार परत ठाऊक नाही पण त्याच्या आत काही तरी केले पाहिजे.. पण करावे तर काय करावे? मला आमच्या लास्ट इयरच्या परिक्षेसारखे टेन्शन आले एकाएकी. दोन चार दिवसात एवढा सारा पोर्शन पूर्ण करायचा? तशा परीक्षा दिल्यात खूप. अभ्यास करूनही नि कित्येकदा अभ्यास न करता ही. मेडिकलचा अभ्यास म्हणजे हनुमानाचे शेपूट. संपता संपतोय थोडीच