घुंगरू - 2

  • 10.9k
  • 4.3k

#@घुंगरू@#भाग 2 सौ. वनिता स. भोगीलमालतीला दिवस गेले ही तर चांगली गोष्ट आहे ,,,मग अस का वाटतंय काहीतरी चुकतंय..... नाही काहीही चुकत नाही,,,, पण आजच का अस घडतय,,, जाऊ दे असेल काही ..... अस मनाशीच कुजबुजत माई तशाच निघून गेल्या, घरात सगळं आनंदच वातावरण होत... बापुनि तर सगळ्या शेतातील मजुराला पेढ वाटून वर जास्तीचे पैसे पण ठरवले,,, ,,,, कारणच तेवढं मोठं होत न.. ...नवस सायास करून पण पोटी पोर होत नव्हतं आणि आता होणार आहे या आनंदात बापूला काय करू अन काय नाही असं वाटत होतं.........सगळे आनंदात होते पण मालती मात्र चिंतेत होती........ रात्री माईंनी गोडधोडाच जेवण केल.....