समर्पण-२ मला वाचन आणि संगीताची खूप आवड. जेव्हा मी घरी एकटी असायची तेव्हा वाचन करायचं किंवा आवडीचे गाणे ऐकायचे हा माझा नित्यक्रम होता. अभय ला यापैकी काहीच आवडायचं नाही. तो त्याच्या कामातच इतका व्यस्त असायचा की त्याला यासाठी वेळच मिळायचा नाही. सुट्टीच्या दिवशी तो मात्र मला बाहेर घेऊन जायचा, खूप फिरायचो आम्ही पण बोलणं मात्र कामपूरतच व्हायचं आमच्यात. एकदा असच अभय ऑफिस मधून घरी लवकर आला आणि मला बोलला की त्याला पंधरा दिवसांसाठी बंगलोर ला जायचं आहे. मी आधीच खूप कंटाळली होती एकट राहून अन त्यात अभय पुन्हा घरी नसणार हा विचारच करवत नव्हता मला. मी बोलली त्याला, "अभय, किती