माहेरची माया

  • 10.3k
  • 1
  • 2.2k

माहेरची माया आमची सारिका वहिनी अगदी पारंपारीक पद्धतीने लग्न करून आली... आणि बोहल्यावर चढली... निमूट सप्तपदी पूर्ण करून सुमित दादाचा हात धरून विना तक्रार दादाच्या साध्या घरात आली.... सामावली...पण तरी माहेर काही तिचं सुटलं नाही....सासरी जे घडेल त्याच्या वरचढ तिच्या माहेरी घडलेलं असयाचच....त्यामुळे बरेचदा संवाद खंडीत व्हायचा.. काहीही सांगितलं तरी मधेच अडवत ती म्हणणारच हे तर काहीच नाही.... आमच्या वाड्यात ना याहून....तरी वहिनीचं वागणं कुणाला खटकायचं नाही.... कारण एरव्ही तिचं वागणं अगदी सालस आणि समजुतदार होतं....तिचं माहेरही होतच तसं तालेवार.... त्यानी अगदी हसतमुखाने मुलगी या साध्या घरी दिली ... ती केवळ माणसं बघूनच... त्यामुळे त्यांच्याकडूनही कधी अगाऊपणा झाला नाही ... की