मेहंदीच्या पानावर (भाग-२)

(22)
  • 11.8k
  • 1
  • 5.4k

३१ डिसेंबरकसलं नविन वर्षाचं स्वागत आणि कसलं काय. ग्रहाणलेल्या चंद्राची कोणी कोजागीरी पोर्णीमा करते काय? आई-बाबांच्या चेहऱ्यावर माझ्या वागण्यातील अचानक बदलाचे अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तर माझ्याकडे सुध्दा नाहीत. त्यांची नजर टाळण्याचा खुप प्रयत्न करते आहे.. पण कुठवर? मन दुःखी असले की कसं सगळं जगच दुःखात बुडालेले वाटते. मागच्या अंगणात सुगंधाचा सडा घालणारा प्राजक्त सुध्दा सध्या मला दुःखीच वाटायला लागला आहे.. “प्राजक्तासारखी माझी सुध्दा स्वप्न पहाटेला गळतात,म्हणूनच प्राजक्ताची दुःखं कदाचित, मला कळतात..” आशुचे दोन मिस्ड कॉल्स दिसले नंतर मात्र परत तिने फोन केला नाही. कदाचीत माझं एकटं रहाणं तिनेसुध्दा स्विकारलेले दिसते आहे. ८ जानेवारीजुलै मध्ये ज्या चित्रपटासाठी गाणी गायली होती