एक होता राजा…. (भाग ६)

  • 11k
  • 2
  • 3.6k

खूप वेळाने राजेश बोलला. "निलम सांगत होती, तो दुबईला मोठा engineer आहे, मुंबईत स्वतःचे दोन Flats आहेत. १.५ लाख पगार, दुबईत असतो… वरचेवर india मध्ये येतो. खूप छान मुलगा भेटला तिला… शिवाय तिचं एक स्वप्न होतं, निलमला world tour करायची होती… मला ते काही जमलं नसतं कधीच… आता तरी निलम जगभर फिरू शकेल… " राजेश हसत म्हणाला. " पण यार… असं कसं रे …. " मंगेश खूप वेळाने बोलला." किती वर्ष एकत्र आहोत आपण… त्यात तुम्ही दोघे किती जवळ… कधीच वेगळे झाला नाहीत तुम्ही,तुम्हा दोघांना ते जमलंचं नाही… दूर जाणं, रोज एकतरी call असतो ना तुमचा एकमेकांना… नाहीतर मेसेज तरी चालू