अंधारछाया - 4

  • 6k
  • 2.7k

अंधारछाया चार मंगला गेले चार रात्री काही माझा डोळ्याला डोळा नाही. ह्यांनी सांगितलं, ही बेबी अशी कड्याकाढून बाहेर जाते म्हणून. मी हबकलेच. हे रात्री जागे झाले म्हणून बरं. गेली असती पुढे चालत एकटी तर शोधायची कुठे तिला ? आधीच ही नवीन गावात. रस्ते माहित नाहीत. काही म्हणता काही होऊन बसलं असतं बरं. मी यांना सांगितलं, ‘आधी सगळ्या दारांना कुलुपं घाला रात्रीची. मगच मला झोप येईल.’ हे म्हणाले मला, ‘विचार तिला काय होतय झोपल्यावर म्हणून. पण ती म्हणते, ’काही नाही मी झोपते छान. इथे आल्यापासून झोप छान लागतेय ’. मला पुढे काही सुचेना विचाराव कसं ते. आता हे अंघोळ करून येतील