ती एक शापिता! - 11

  • 7.4k
  • 3.9k

ती एक शापिता! (११) सायंकाळी कार्यालयातून परतलेला सुबोध हातपाय धुऊन आरशासमोर उभा राहून भांग काढत असताना त्याचे लक्ष केसांकडे गेले. बऱ्याच केसांची चांदी झालेली पाहून तो आश्चर्यचकित झाला. चाळिशी उलटली नाही तोच बरेच केस पांढरे झाले होते. लग्न होईपर्यंत त्याचं विश्व मर्यादित होतं. काही काळजी नव्हती. लग्न झाल्यानंतर सांसारिक अनेक अडचणी मानगुटीवर बसल्या. त्यातल्या त्यात स्वतःचं सामर्थ्य आणि सुहासिनीच्या समाधानासाठी तो तळमळत राहिला. त्याच्या पश्चात, त्याच्या संमतीने फुललेल्या सुहा-निलेशचे संबंधाची नाही म्हटलं तरी त्याला एक प्रकारची चिंताच होती. त्यापूर्वी कार्यालयातला भ्रष्टाचार, ऑडिट प्रकरण अशा विविध घटनांमुळे त्याचे केस पांढरे होत होते... "बाबा, बाबा...." अशोकचा आनंदी आवाज ऐकून तो भानावर आला.