कोरोना : प्रत्येकाचे टेन्शन वेगळे

  • 5.2k
  • 1.3k

आज सकाळी सकाळीच सुरेशचा व्हिडिओ कॉल आला. मी विचारात पडलो, की बुवा याने आज सकाळी सकाळीच व्हिडिओ कॉल कसा काय केला? बोला सुरेश शेठ, आज सकाळी सकाळीच व्हिडिओ कॉल? काय विशेष? ‘गरीबी फार वाईट असते’ निराशेने आडवी मान हलवीत सुस्कारा सोडत तो म्हणाला. का रे काय झालं? कुणाबद्दल बोलतोय तू? त्याचं हे रुप मला नविनच होतं. आता मी अजून दुसऱ्या कुणाबद्दल बोलणार? माझ्याबद्दलच बोलतोय. काय सुरेश शेठ, आज कुणी भेटलं नाही का? गरिबी कशाला म्हणतात ते तरी माहिती आहे का? करा चेष्टा, इथं मी काय दुःखात आहे, ते राहिलं बाजूलाच आणि... जाऊ द्या गरिबांची थट्टा करायची जगाची रितच आहे म्हणा.