आमच्या घरी घडलेला हा खरा प्रसंग आहे. आमच्या कुटुंबामध्ये मी, आई, बाबा,ताई, आणि दादा असे पाच जण आहोत. ताई च लग्न झालंय आणि ती जवळच आमच्या इथे एका बिल्डिंग मध्ये राहते. आम्ही तेव्हा एका चाळीत राहायचो. चाळ तशी लहान होती पण आजूबाजूला माणसांची वर्दळ, बाजार, किराणा दुकान हाकेच्या अंतरावर होत आणि चाळीत बरीच वर्ष राहत असल्याने आम्हाला त्या चाळीतून दुसरीकडे राहायला जायचं असं कधीच वाटत न्हवतं कारण चाळीत असल्याने सगळ्या धर्माची लोकं राहायची आणि सगळेच मिळून मिसळून एकमेकांचे सण साजरे करायचे.. अशीच एके वर्षी दिवाळी असताना घडलेला हा प्रसंग..दिवाळीत आम्ही नेहमीप्रमाणे खूप मज्जा केली होती, फराळ केला , फटाके उडवले