तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १७

(32)
  • 13k
  • 3
  • 6.6k

तो... दरवाजातून आत गेला म्हणजे..... ओम खडबडून जागा झाला. शरीर जरी गोठून गेलं असलं तरी त्याचा मेंदू अजुन विचार करायच्या स्थितीत होता. खूप कष्टाने आपल्या डोळ्यांची उघडझाप करत तो नीट पहायचा प्रयत्न करत होता. परंतु त्याच्याभोवती वेढलेल्या धुक्यातून त्याला काही स्पष्ट दिसेना... आपल्या दुबळ्या पडलेल्या शरीराला जोर देत त्याने थोडी हालचाल करायचा प्रयत्न केला परंतु धुक्याच्या दोरखंडाने त्याला पक्क जखडून ठेवल होत.... नक्कीच अनय त्याच्यावर सोपवलेल्या कामगिरीत अपयशी ठरला... ओमचा योजनेप्रमाणे त्याने अनयला तिथे पोचल्यावर एक महत्त्वाची कामगिरी सोपवली होती. ते व आजूबाजूचा पूर्ण परिसर त्या शक्तींच्या अधिपत्याखाली असणार होता. घरात सर्व वाईट शक्तींचं वास्तव्य असल्याने कोणालाच आत प्रवेश करणं शक्य