ते सर्वजण अनयच्या घरासमोर येऊन उभे होते. आधीच त्या आवारात बाहेरच्या भागाच्या मानाने कडाक्याची थंडी जाणवत होती. तेवढ्या आवारातील हवा कोंडल्यामुळे कोंदट बनली होती. बाहेरच्या हवेला आत यायला त्या शक्तीने मज्जाव टाकला होता. मलूल होऊन जमिनीवर पडलेली बागेतील झाड आपलं लुळ अंग सावरत म्लान नजरेने त्यांना आत न जाण्याचा इशारा करत होती. तिथलं एकंदर वातावरण पाहूनच अंगावर शिसारी येत होती. पण घराची अवस्था पाहून सर्वांच्याच हृदयात धडकी भरली. घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून सफेद धुराचे लोटच लोट निघत होते... जणू काही घरात आग लागली होती... घरावर हिरव्या काळसर ढगांचा एक जाडजूड थर घरावर कोसळण्याच्या तयारीत होता आणि तो धूर हवेत विरून जायच्या