आघात - एक प्रेम कथा - 7

  • 7.2k
  • 3.3k

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (7) प्रथम वर्ष बी.ए.ची वार्षिक परीक्षा अवघ्या महिन्यावर येऊन ठेपली होती. साऱ्यांच्या नजरा माझ्यावर लागल्या होत्या. पण इकडे माझा दुसराच उद्योग सुरू होता. मी माझ्या ध्येयउद्दिष्टांपासूनच विचलित होत होतो. पण नाही आता पुन्हा अशी चूक होता कामा नये, असा मनाशी निश्चय केला. थोडे दिवस सगळयांपासून अलिप्त राहून फक्त अभ्यासावर भर दिला. बारावीमध्ये सर्वप्रथम आलेला मी विद्यार्थी होतो. त्यामुळे अपेक्षांची पूर्तता करणं हे मी माझं कर्तव्य मनात होतो. माझ्याकडून निराशा कोणाचीही होऊ नये. पूर्वीप्रमाणेच सगळयांच्या मनात माझं स्थान असावं. मी अभ्यासाचा जोर वाढवित होतो. वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास करणे सुरू होते. मित्रांबरोबर सकाळी लवकर उठून कॉलेजला जाणे,