आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (6) सतिशने सगळया साथीदारांना आदेश दिला. तसे ते एका पाठोपाठ गाडीत बसले आणि क्षणाचाही विलंब न करता निघून गेले. मी विव्हळत, तडफडत त्या निर्जन जागी झाडीत पडलो होतो. संध्याकाळचे आठ वाजले होते. भीतीचे काहूर माजले होते. चारी दिशांवर अंधार पसरत होता. त्यांना थोडी देखील माझी द्या आली नाही. गुडघे फोडले होते. पाठीत काठ्यांचे व्रण उठले होते. अमानुषपणे त्यांनी मारहाण केली होती. जायचे तर कुठे? या पडलेल्या गडद अंधारात वाट कशी शोधून काढणार? रात्रभर थंडीनं कुडकुडत पडावं लागणार. एखादं श्वापद आपणाला गिळंकृत करणार तर नाही ना? असे अनेक नाना तऱ्हेचे विचार आणि प्रश्न मनाला भेडसावत