आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (2) रोषणाईने घर सजलं होतं. इतका मोठा वाढदिवस. मला आश्चर्य वाटत होतं. आमच्या अगोदर सारे मित्रमैत्रिणी आले होते. तसं पहायला गेलं तर आम्हालाच थेाडा उशीर झाला होता. मित्रांच्या आग्रहाखातर मी गेलो होतो. पण तरीही सुमैयाने मला वाढदिवसाला बोलविले नसल्याची खंत मनात होतीच. ती माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. केक कापण्यात आला, सगळयांनी सुमैयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देण्याची माझी वेळ आली. हातात हात दिल्यानंतर हात थरथरू लागले. मी थोडं बावरल्यागत झालो. मी बावरलेला पाहून माझे मित्र आणि खुद्द सुमैयाही हसू लागली. तिने जवळच असलेल्या बॉक्समधून केक काढला आणि मला भरवला. मी मित्राबरोबर थोडा पुढे