कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन - भाग-४

(11)
  • 10.6k
  • 1
  • 4k

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन –भाग-४ था ------------------------------------------------------------------------------------------------- नमस्कार मित्र हो , मी अभि, अभिजित सागर देशमुख .. या अगोदर आमच्या देशमुख परिवारातील – दोन व्यक्तींशी तुमची भेट झाली आहे त्यातले श्री. सागर देशमुख म्हणजे माझे बाबा , आणि सौ.सरीत देशमुख .माझी आई . यांच्याशी तुमची भेट झाली आहे . दोघांनी तुम्हाला त्यांच्याबद्दल काय सांगितले आहे ? हे मी तुम्हाला विचारणार नाहीये. कारण स्वतःबद्दल सांगतांना प्रत्येकजण काळजीपूर्वक सांगत असतो , स्वतःचा परिचय कुणी वाईट शब्दात थोडाच करून देत असतो का ? नाही ना .. त्यापेक्षा आणखी एक महत्वाचे..ते म्हणजे . आपण किती चांगले आहोत “, हे ठासून सांगतांना .. आपल्या भवतीचे सारे