सर्व मुलांचा दंगा चालू होता, त्यात सागरच्या आईने सर्वाना पोहे आणुन दिले. पोहे खाऊन सर्वांनी जरा कामात मदत करावी अशी त्यांची भाबडी अपेक्षा. सागरचे सगळे मित्र आणि आपला अमू. सर्वांनी आप-आपले पोहे संपवत कामाला लागले. पण अमूची नजर कोणाला तरी शोधत होती. तो इकडे तिकडे बघत कोणाला तरी शोधत होता. सागर: कोणाला शोधतो आहेस का?अमू: नाही नाही... कुठे काय..सागर: ती आणि पिंकी बाजारात गेल्यात आई सोबत येतील थोडयावेळात...आता बोलालं हि पिंकी कोण.. पिंकी म्हणजे आपली वर्षा. तिला घरी सर्व लाडाने पिंकी बोलत. अमू: ह् बर बर... सागर: मग आज बोलणार आहेस का???अमू: मन तर खूप आहे बोलायचं पण नको. एखाद्यावर आपण किती जबरदस्ती