लव्हस्टोरी - प्रेमवेडा - २

(23)
  • 8.8k
  • 3
  • 5.5k

२0 फेब्रुवारी , शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा दिवस. मी देखील त्या दिवशी लवकर तय्यारी करून शाळेत निघालो, शाळेत पोहोचताच मित्रांना भेटुन, त्यांच्यासोबत गप्पा मारण्यात व्यस्थ झालो. सर्वजण छान नटून थटून आलेले. सर्व पटांगण मुला-मुलींनी भरलेलं होत... सहजच म्हणून नजर गेटकडे गेली आणि ती दिसली...ती...तिने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली होती, आपल्या सोनेरी केसांचा गोल असा आंबोडा घालून त्यावर मोगऱ्याचा गजरा माळला होता. पानेरी नयनात काजळाची हलकी लकीर ओढली गेलेली, अनं त्या गुलाबांच्या पाकळी सारख्या ओठांवर गुलाबी रंगाची लिपस्टिक अजुन शोभुन दिसत होती.. नाकात नथ घातलेली आणि कपाळावर लावलेली चंद्रकोर अजुनच तिच्या सौंदर्यात भर घालत होती..अशा तिच्या सौंदर्ययाने मी तिच्याकडे एकटक बघत