एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 31

  • 5.3k
  • 1
  • 2.5k

अजिंक्यला जाऊन आज तेरा दिवस झाले होते ..रियाने अजिंक्यची तेरावी करण्याचा विचार मृणालला एकविला होता पण त्याला या सर्वांवर विश्वास नसल्याने तिने रियाला साफ नकार दिला त्याऐवजी काही पैसे आणि कपडे जवळच्या आश्रमात भेट देण्याविषयी मृणालने रियाला सांगितले ..म्हणून आज दोघीही सकाळी - सकाळी आश्रमात पोहोचल्या होत्या ..अजिंक्यच्या जाण्याने दोघांच्याही जीवनात एक जागा खाली झाली होती आणि त्याच अस अचानक जाण दोघांनाही आतून तोडून गेलं होतं ..मागील काही दिवस त्या शांतच होत्या पण आज आश्रमात आल्यावर छोट्या - छोट्या मुलांचा आवाज ऐकून त्यांच्याशी खेळून काही क्षणकरिता का होईना दोघीही आपलं दुःख विसरू शकल्या होत्या ..काही अंतरावरच वृद्धाश्रम देखील