एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 25

  • 5.5k
  • 2.5k

मृणाल - प्रज्ञाचे संबंध थोडे फार सुधारू लागले होते त्यामुळे मृणाल त्यातून स्वतःला सावरू लागली ..अजिंक्य ऑफिसच्या कामात बिजी राहायचा ..प्रज्ञा - मृणालमध्ये अशी स्थिती असतानाही अजिंक्य काहीच का बोलत नाही हे बघून मृणाल गोंधळली होती ..अजिंक्य नेहमीच स्पष्ट मत दर्शविणार्यातला होता तेव्हा त्याच शांत बसणं म्हणजे नक्कीच काहीतरी त्याच्या मनात शिजत होत ते काय होत याचा शोध ती घेऊ लागली होती तरीही तिच्या हाती काहीच लागलं नव्हतं .. ..प्रज्ञा भीतीमुळे का असेना पण मृणालशी बोलू लागली होती तर प्रज्ञाबद्दलची गोष्ट अजिंक्यला सांगावी हे मृणालच्या मनातही आलं नव्हतं पण प्रज्ञाला याबाबत शाश्वती नसल्याने ती शंकेच्या रुपानेच मृणालकडे पाहत