अजिंक्यच म्हणणं बरोबर निघालं ..लोक बोलून - बोलून थकून गेले आणि दोघानिही त्याकडे लक्ष न दिल्याने सर्व आपोआपच आपल्या कामात व्यस्त झाले ..कंमेंट पास करण सुरू होत पण त्याचा फार प्रभाव त्यांच्या आयुष्यावर पडत नव्हता ..अजिंक्य आपल्यासाठी लढतोय हे पाहून तर मृणाल आणखीच जिद्दीने सर्व प्रसंगांना सामोरे जायला उभी झाली होती ..नात्यांची परीक्षा दुःखाच्या काळातच होते हे आईच्या वागण्यावरून पटलं होत ..विश्वास ठेवणारे कुणाच्याही शब्दात न येता आपल्या शब्दांवर टिकून राहतात हे अजिंक्यच्या वागण्यावरून तिला कळून चुकलं ..परिस्थिती कशीही असो पण जेव्हा हा विश्वास नात्यांची परीक्षा घेऊ लागतो तेव्हाच तर प्रेमाची परिक्षा सुरू होते आणि नंतरच प्रेम या