एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 19

  • 6k
  • 1
  • 2.6k

गावात मृणालबद्दल फक्त चर्चा सुरू नव्हती तर तिच्यावर वेगवगेळे आरोप देखील लावल्या जात होते ..अजिंक्य / मृणालचे ज्या - ज्या व्यक्तींसोबत वाद होते त्यांनी तर होत नव्हतं सर्व सांगायला सुरुवात केली ..त्यात अजिंक्यचे मित्र देखील होते ..त्यांनीही त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी उघड करण्यास सुरुवात केली ..संबंध चांगले असताना चांगल्या मित्रांना सांगितलेल्या गोष्टी संबंध बिघडल्यावर पसरायला मात्र वेळ लागत नाही आणि हेच त्यांच्यासोबत होत होतं फक्त याबद्दल कुणालाच काही माहिती नव्हत ..गावात वाऱ्याच्या वेगाने जरी ही गोष्ट पसरली होती तरी अजिंक्यच्या घरी मात्र पोहोचली नव्हती .तेवढे दिवस तरी त्यांच्या घरी प्रेमाचं , सलोख्याचे वातावरण होते ..पण आता तोही क्षण येणार