लव्हस्टोरी - प्रेमवेडा - 1

(27)
  • 14.9k
  • 2
  • 7.7k

अग ऐकं तरी तो तिच्या मागे जात बोलला ती मात्र आपल्याच धुंदीत चालत घरी निघाली होती. हे रोजच झालं होत.प्रिया तिच नाव सगळेच तिला पियू म्हणूनच हाक मारत. प्रिया दिसायला सर्व सामान्य मुलींसारखी. गोल सुबक चेहरा, नाजूक गुलाबी ओठ, छोटस नाक आणि तितकाच राग ही नाकावर. सोनेरी केस, अशी ही आम्हची प्रिया. अगदी एखादया बाहुली सारखी सुन्दर.आणि हो तो तर राहिलाच की आपला हिरो. अमोघ उर्फ अमु. दिसायला सावळा, सडपातळ बांधा पण तेवढाच चार चौघात उठुन दिसणारा असा हा अमु.... तर झाल अस की दोघे एकाच शाळेत शिकत होते, मात्र तो होता शेवटच्या वर्गात आणि ती होती नववीत. त्याने एकदा कधी