बारा जोतिर्लिंग भाग १८

  • 6.8k
  • 2
  • 2.3k

बारा जोतिर्लिंग भाग १८ नागेश्वर ज्योतिर्लिंग श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शिवांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. ओंढा नागनाथा प्रमाणेच हे ही जोतिर्लिंग समजले जाते. हे गुजरातमधील द्वारका धामच्या बाहेर १ कि.मी. अंतरावर आहे. रुद्र संहितामध्ये या देवतांना दारुकावने नागेशम म्हटले गेले आहे. धर्मग्रंथ त्यांच्या उत्पत्तीची कथा ऐकण्याचा महान महिमा सांगतात. कथा श्रद्धापूर्वक ऐकणारा शिवभक्त स्वत:ला पापांपासून मुक्त करून दैवी शिवलोकाकडे वळतो. नागेश्वर शब्दाचा अर्थ नागांचा देव असा आहे. भगवान शिवाच्या गळ्याभोवती नेहमीच साप आढळून येतो. म्हणूनच, हे मंदिर विष आणि विषाशी संबंधित आजारांपासुन मुक्ती यासाठी प्रसिद्ध आहे. नागेश्वर शिवलिंग शिळेच्या गोलाकार दगडातून त्रिपक्षी रुद्राक्ष स्वरूपात स्थापित केले गेले आहे. इथे