बारा जोतिर्लिंग भाग १७

  • 6.5k
  • 2.6k

बारा जोतिर्लिंग भाग १७ मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे घृष्णेश्वर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. दौलताबाद पासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्याजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या मंदिराचा उल्लेख आहे. येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्या आस्तित्वात असलेले हे मंदिर इ.स. १७३०मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर अहिल्याबाईंनी आपल्या सासु गौतमीबाई उर्फ बायजाबाई यांच्या स्मरणार्थ या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा