अघटीत - भाग १९

(35)
  • 9.9k
  • 6
  • 5.1k

अघटीत भाग १९ दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ती चहा घेण्यासाठी स्वयंपाक घरात गेली . आजही तिला तसे बरे वाटत नव्हते ,पुर्ण विश्रांती घ्यायचे तिने ठरवले होते . आजची संध्याकाळची पार्टी तिच्यासाठी खुप खास असणार होती . गौतमने तिच्यासाठी खुप खर्च केला होता आणि तिलाही खुप उत्सुकता होती त्याची . टेबलावर बाबा,आई दोघेही चहा घेत बसले होते .. बाबा तिच्याकडे पाहून हसला ..”हेल्लो प्रिन्सेस कशी आहेस बेटा .. कॉलेजला नाही का जायचे ? आणि असा का दिसतो आहे तुझा चेहेरा ... बरे वाटत नाही का पिल्लूला ?..असे म्हणून बाबाने तिचा हात प्रेमाने हातात घेतला . कधी चिंकी तर कधी प्रिन्सेस तर