बारा जोतिर्लिंग भाग ११

  • 10k
  • 2
  • 4.5k

बारा जोतिर्लिंग भाग ११ त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र– नाशिक) त्र्यंबकेश्वर हे शहर महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिकपासून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर त्र्यंबकेश्वर मंदिर आहे हे ठिकाण शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असुन ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर यानांवाने प्रसिद्धआहे. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्टय म्हणजे या लिंगात ब्रम्हा, विष्णु आणि महेश हे तीन देव असल्याचे समजले जाते, म्हणून याला त्र्यंबकेश्वर म्हटले जाते. हेमाडपंती पध्द्तीचं बांधकाम असलेल्या या मंदिराचे स्थापत्य आणि शिल्पकला हे ही या मंदिराचे वैशिष्टच आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बारा ही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. येथील