अघटीत - भाग १६

(36)
  • 11.7k
  • 1
  • 6k

अघटीत भाग १६ सकाळ झाली आणि क्षिप्रा रूम मधून बाहेर आली . काल रात्री उशिरा झोप लागल्याने ती उठली तेव्हा नऊ वाजून गेले होते . तिच्या मनात थोडी धाकधूक होतीच ... पण तिच्यासाठी आजचा दिवस वेगळाच होता . कारण घरात एकच गडबड चालली होती .. आजी चहा पीत होती आणि बाबा तिच्या शेजारी बसून बोलत होता . आई कसले तरी डबे ,थर्मास भरत होती . “आई कधी आलीस तु ? कसली ग चाललीय गडबड ..? क्षिप्राने विचारताच आईने सांगितले ती नुकतीच आली होती सातारहुन आत्याच्या नवऱ्याला आज सकाळी अपघात झाला होता . रस्त्यातील लोकांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले होते आणि