बारा जोतिर्लिंग भाग ६ परळी वैद्यनाथ परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेचे एक स्टेशनही आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते. भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. ब्रम्हा ,वेणू आणि सरस्वती यांचा त्रिवेणी संगम इथे पाहायला मिळतो . हेमाडपंथी शैलीतले हे चिरेबंदी मंदिर तीन घाट,दगडी दीपमाळ,सभामंडप ,तीन गर्भगृहे व दोन नंदी या समावेत वसले आहे.हे मंदिर शाळीग्राम शीळेचे आहे ,व एका टेकडीवर आहे . याच्या शिखरावर प्राणी व देव देवतांची शिल्पे आहेत . बाजूला अकरा