बारा जोतीर्लींगे भाग २

  • 12.9k
  • 1
  • 6.3k

बारा जोतिर्लिंग भाग २ सौराष्ट्रातील सोमनाथ शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वांत पवित्र तीर्थ मानलं जातं ते सोमनाथ. सोमनाथचं विधीप्रमाणे प्रथम दर्शन घेऊनच पुढील ज्योतिर्लिंगं पाहावीत असा संकेत आहे. हे मंदिर १६ वेळा उध्वस्त करण्यात आलं होतं व परत बांधण्यात आल्याचं सांगण्यात येतं. गुजरातमध्ये सौराष्ट्रात वेरावळ बंदरावर वसलेले सोरटी सोमनाथ मंदिर हे एक महत्त्वपूर्ण हिंदू मंदिर आहे देशातील प्राचीन तीर्थस्थळांत सोमनाथ मंदिराचा समावेश होतो. त्याचा उल्लेख स्कंदपुराण, श्रीमद् भागवत गीता, शिव पुराणात आढळतो. वेद, ऋग्वेदातही सोमेश्वर महादेवाचा महिमा वर्णिला आहे. सर्व ज्योतिर्लिगातून सोमनाथ येथील मंदिराचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. सोमनाथ मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध व धार्मिक पर्यटनस्थळ आहे. येथील मंदिराच्या प्रांगणात दररोज