आघात एक प्रेम कथा परशुराम माळी प्रस्तावना ‘आघात’या प्रा. परशुराम माळी यांच्या कादंबरीविषयी लिहिताना मला खूप आनंद होत आहे. याचे कारण या कादंबरीकाराला मी रोज पाहतेय. कदाचित नुसती कादंबरी वाचली असती तर गोष्ट वेगळी होती. पण परशुराम याचीसंवेदनशीलता, नम्रपणा, त्यांचं सोसणं, सोशीकपण मी पाहते. तो खूप संकोची आहे. तो जेव्हा जेव्हा मला भेटतो, दिसतो तेव्हा दरवेळी तो मला नमस्कार करतो. दरवेळी नमस्कार कशाला करतोस? असं मी म्हणाले, तरी त्याच्या हातून तसं घडतं. त्याचं पोरकेपण, त्याचं कष्ट, त्याची जिद्द, त्याचा उच्चशिक्षितपणा, त्याचं स्वत:बद्दलचं मत, त्याच्याकडे पाहून वाटतं हा कुणालाही दुखावणारा नाही. अशी व्यक्ती म्हणून त्याची वैशिष्ट्ये एवढ्यासाठी नोंदवतेय की या कादंबरीचा