एका सशाची गोष्ट

(12)
  • 37.7k
  • 2
  • 12.4k

उद्धव भयवाळ औरंगाबाद एका सशाची गोष्ट बालमित्रांनो, आनंदपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात गंगूबाई नावाची एक अत्यंत गरीब स्त्री राहत होती. रोज सकाळी उठून रानामध्ये जाऊन गवत किंवा लाकडे गोळा करायची आणि तो गवताचा भारा किंवा ती लाकडाची मोळी गावामध्ये आणून विकायची असा तिचा दिनक्रम होता. एक दिवस काय झाले, नेहमीप्रमाणे गंगूबाई सकाळी उठून रानामध्ये गेली. ती एके ठिकाणी गवत गोळा करीत असतांना तिथे कसा कोण जाणे एक छोटासा ससा आला आणि गंगूबाईच्या भोवतीभोवती फिरू लागला. कापसासारखे मऊ मऊ होते त्याचे अंग. पांढरा शुभ्र होता त्याचा रंग. त्याचे लुकलुकणारे डोळे पाहून गंगूबाईस खूपच