कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते निसर्गसौंदर्य. प्रत्येक मराठी माणसाने पावसात एकदा तरी कोकणात नक्कीच जाऊन यायला हवं. मी मुळची कोकणातली. म्हणजे माझा जन्म हा कोकणातल्या सिंधुदुर्ग तालुक्यातला. खुप लहान होते तेव्हाच मुंबईत घरच्यांसोबत स्थायिक झाले. पण मन मात्र अजून ही त्या कोकणात अडकलं आहे. पावसाळा सुरू झाली की आठवत येते ती गावची. मग ते कोणतही गाव असुद्या. मला वाटत प्रत्येक गावाचा हा स्वतःचा वेगळा असा इतिहास आहे. तर आपण इतिहासात न जाता कोकणात जाऊया. पाऊस म्हटला की आठवणी, आणि आठवणी आठवल्या की सगळं जग विसरायला होत नाही..!!. तसच काहीसं माझ ही. मी जेव्हा गावी होते ना तेव्हा, म्हणजे जरा