रिच डॅड पुअर डॅड (अनुभव, समीक्षा, माहिती )

  • 22.5k
  • 3
  • 6.7k

रिच डॅड पुअर डॅड (अनुभव, समीक्षा, माहिती ) आत्तापर्यंत पाच वेळा मी हे पुस्तक खरेदी केलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी हे पुस्तक माझ्याकडून घेऊन गेले, पुन्हा पुस्तकाचं नावही काढलं नाही! असो! खरं सांगू, जवळ जवळ तीन वेळा मी हे पुस्तक वाचलंय. तरीही, लेखकाने सांगितलेलं सगळंच कळलं, असं नाही म्हणू शकत. जेवढं कळलं, ते अमलात आणायचा आणि तसं वागायचा प्रयत्न करतो. सुरुवातीला खूप दिवस हे पुस्तक कपाटात असंच पडून होतं. ऐतिहासिक कथा, कादंबऱ्या वाचनाऱ्याला कसली आलीय गुंतवणूक आणि पैशांच्या पुस्तकांची आवड! तरीही कपाटात, समोर ठेवलेलं हे पुस्तक नेहमी दिसायचं आणि कधीतरी एकदा वाचून काढावं असं वाटायचं. निमित्त झालं