" सॉलिड आहेस तू ... " कादंबरी चालता चालता बोलली आकाशला." का ?? " ," पूजा बोलते तस... तुलाच कस हे निसर्ग सौंदर्य सापडतं... मला बुवा असे काहीच दिसले नाही इतक्या वर्षात. " ," निसर्ग जेवढे देतो ना ... तितकेच परत सुद्धा घेत असतो... समोर बघ.. " कादंबरी समोर बघू लागली. गावाच्या वेशीपाशी आलेले दोघे. वादळाने काही झाडे मुळापासून उपटून काढली होती. काही घरांची पडझड झालेली. शेतात काही उभी पिके झोपली होती. जागोजागी पाणी." निसर्गाची काळजी घेतली कि तो आपली काळजी घेतो. " आकाशचे असे बोलणे आवडले कादंबरीला." पूजा आणि तू ... खूप जुने सोबती आहात ना... कधी प्रेम वगैरे